विविध सामाजिक उपक्रम राबवत आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस सामाजिक दिवस म्हणून साजरा
रक्तदान शिबीर, पाच हजार विद्यार्थ्यांना नोटबुक आणि दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शेकडो विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा नोटबुक वाटप करण्यात आले. पुढील सहा दिवसांत पाच हजार विद्यार्थ्यांना एकूण 27 हजार नोटबुक वाटण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. तसेच दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकाली मंदिरात महाआरती केली आणि विविध धार्मिक स्थळांना भेट देत प्रार्थना केली. त्यानंतर सामाजिक उपक्रमांची सुरुवात झाली. भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने जनसंपर्क कार्यालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात 200 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत “रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान” हा संदेश दिला.
दुपारी 11 वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले. पुढील सहा दिवसांत महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा नोटबुक देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
पडोली येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. बाबुपेठ छोटा बाजार येथे लाडू तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दीक्षाभूमी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात उपस्थित राहून आमदार जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
तुकुम येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटनही आमदार जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. जोड देऊळ येथे आयोजित दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांनी दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप केले. योग नृत्य परिवार यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला.
भारतीय जनता पक्ष आणि आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने शहरातील विविध धार्मिक स्थळांवर महाआरती आणि यज्ञ आयोजित करण्यात आले होते. शहरातील अनेक भागांमध्ये आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, लाडू तुला, साहित्य वाटप यांसारखे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले.
आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस समाजहिताची भावना व्यक्त करणाऱ्या या उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र आणि मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.