सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास – आमदार देवराव भोंगळे
कोरपना :- तालुक्यात जनतेने मला भरघोस मताने निवडून दिले हे मी माझं भाग्य समजतो. या भागात अनेक विकास कामांना चालना मिळाली नाही त्यामुळे देवस्थानाचा विकासासाठी कटिबद्ध आहोच परंतू सर्वांगीण विकास करणे हाच माझा ध्यास असून विकासात्मक दृष्टीठेवून प्रत्येक मतदाराचे ऋण फेडण्याचे काम माझे आहे. देवघाट हे ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र असल्याने त्यानुसारच सर्व सोई उपलब्ध केल्या जातील. एवढेच नाही तर देवस्थान विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्नरत राहील.असे मत त्यानी दत्तदेवस्थान देवघाट यात्रा येथील उद्घाटनीय कार्यक्रमा प्रसंगी त्यानी व्यक्त केले.
शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व प्रत्येकाचा जीवनातील दुःख, दारिद्र आणि संकटे दूर करो, सर्वांना सुख-समृद्धी लाभावी हीच त्रिगुणात्मक प्रार्थना त्यानी यावेळी श्री दत्त चरणी केली.
प्रसंगी दत्त देवस्थान समिती व कोरपना तालुका पोलीस पाटील संघटना यांचे कडून आमदार देवराव भोंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अनुसुचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वसंता पा. मडावी, सरपंच मंजुषा देवाडकर, लोणीचे उपसरपंच अविनाश वाभिटकर, भाजपा नेते शशिकांत आडकिणे, ललिता डुबरे,डॉ. अरुण ठाकरे, दिलीप जनेकर, घनश्याम नांदेकर, गजानन खामनकर, विठ्ठल पिंपळकर, सुभाष वडस्कर, साईनाथ सोनटक्के, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष दिनेश खडसे, विनोद नरेन्दुलवार, तिरूपती किन्नाके, अजय तिखट, रवी बंडीवार यांचेसह परीसरातील भाविकभक्तांची मोठी उपस्थिती होती.