CMPL कंपनी च्या हुकूमशाही ने कामगार त्रस्त…
राजुरा :- राजुरा येथील CMPL धोपटाला ओपन कास्ट माईन्स-2, बल्लारपूर क्षेत्र ही कंपनी कामगारांवर सातत्याने अन्याय करीत आहे नुकत्याच या कंपनीच्या व्यवस्थापकाने सदर कंपनीचे जुने काम संपुष्टात आल्याने वर्षानुवर्षे या कंपनीत काम करीत असणाऱ्या १० कामगारांना कंपनीने कुठलाही कसूर नसताना ‘जुने काम संपत आहे..! नवीन काम मिळाल्यास कंपनीमध्ये परत सामावून घेऊ..!’ असे खोटे आश्वासन देऊन कामगारांना कामावरून काढले.
परंतु याच कंपनीला नवीन काम मिळाले असताना देखील कंपनी ने कामावरून काढलेल्या त्या १० स्थानिक कामगारांना कंपनीमध्ये परत घेण्याऐवजी कंपनी व्यवस्थापकाने स्थानिकांना डावलून नवीन परप्रांतीय कामगारांचा भरणा कंपनीमध्ये करून या १० कामगारांना कामापासून वंचित ठेवत कामगारांवर उपासमारीची वेळ आणून अन्याय केला आहे.
याशिवाय याच कंपनी मधील कामगारांकडून मेस च्या नावाने वाजवी दरापेक्षा अधिक पैसे पगारातून कपात करण्याचा प्रकार ही कंपनी सतत करत करून ही कंपनी कामगारांची आर्थिक तथा मानसिक पिळवणूक करीत आहे.
या आधी देखील अशाच प्रकारच्या काही तक्रारी कामगारांकडून जय भवानी कामगार संघटनेला प्राप्त झाल्या होत्या ज्यामध्ये ‘शासनाने नवीन ठरविलेल्या वाढीव किमान वेतनानुसार पगार देण्याऐवजी उलट दररोज प्रमाणे ४५ रुपये कामगारांना कमी देण्यात असल्याबाबत कामगारांनी संताप व्यक्त करताचं संघटनेला प्राप्त तक्रारी नुसार *जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी* सदर समस्यांचे निवारण करण्याकरिता संबंधित विभागांमध्ये दिनांक २०/०५/२०२४ रोजी प्रत्यक्ष कार्यालयात आणि ऑनलाइन पद्धतीने तक्रार केली होती.
परंतु सदर कंपनी एक वाद संपत नाही तसेच परत दुसऱ्या वादाच्या भवऱ्यात येत असल्याने आता आणखी १० कामगारांवर उपासमारीची वेळ आणून आणि मेस बिल मध्ये वाजवी दरापेक्षा अधिकच दर वाढवून कंपनीकडून कामगारांवर होत असलेल्या अन्यान दूर करण्याकरिता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी दिनांक १६/१२/२०२४ रोजी संबंधित विभागामध्ये प्रशासनाला समस्यांचे निवारण करण्याकरिता लेखी स्वरूपी तक्रार केली आहे. व लवकरच या कामगारांना न्याय मिळाला नाही तर भविष्यात सदर कामगारांच्या कुटुंबासह उपोषणाला बसण्याचचा इशारा देखील दिलेला आहे.