आमदाराचा फोन अन् विद्यार्थांना मिळाली बस

0
12

आमदाराचा फोन अन् विद्यार्थांना मिळाली बस

खूप वेळेपासून होते बस स्थानकावर ताटकळत…

 

गडचांदूर :- विकासाचा नारा देत देवराव भोंगळे यांनी निवडणूक लढवली आणि आमदार झाले. निवडणुकी दरम्यान त्यांच्या प्रत्येक सभेत त्यांनी विकासात्मक दृष्टीने पाऊल टाकन्याचे आणि जनतेच्या समस्याचे निवारन करण्याचे आश्वस्त केले. याचीच प्रचिती आमदार झाल्यावर दिसून येत असून निमनी येथील मुले गडचांदूर येथे बस करिता ताटकळत असल्याचे एका युवकाने फोन करून सांगितले. आमदाराने फोन लावताच लगेच दहा मिनिटात बस आली. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. थंडीच्या दिवसात लवकर घरी पोहचल्याने पालक सुद्धा आनंदी झाले.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील निमनी येथील अंदाजे ३० मुले ही शिक्षणा करिता गडचांदूर येथे जातात. परंतू विद्यालय सुटले की ते बस अभावी नेहमीच गडचांदूर बस स्थानकावर ताटकळत राहतात. ही बाब नित्याचीच. त्यामुळे त्यांना नाहक त्रासही सहन करावा लागतो. आज देखील तीच अवस्था मुलांची झाली होती. एकीकडे थंडीचा पारा चढला असताना दुसरी कडे घरी जाण्याची ओढ. या परिस्थितीत त्यांना फक्त बस येण्याची आस लागली होती. परंतू बस काही येईना, शेवटी गावातीलच एक युवक बस स्थानकाकडे गेला असता त्याला विद्यार्थी उभे दिसले. त्याने थेट आमदार यांना फोन लावून सांगितले. आमदारांनी देखील विलंब न करता अवघ्या दहा मिनिटात बस उपलब्ध करून दिली आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर आमदाराने बस पाठविली याचा आनंद देखील जाणवत होता.

महिना व्हायच्या आत आमदाराने कामाचा सपाटा लावला असून नेहमीच फोन वर उपलब्ध असल्याने ते समस्याचे लगेचच निवारण करीत असल्याची प्रचिती या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष व नेहमी उपलब्ध असलेले आमदार आपल्याला मिळाल्याची जनमाणसात चर्चा आताच सुरू झाली आहे.

मी बस स्थानकावर गेलो असता तिथे गावातील विद्यार्थी दिसून आले. विचारणा केली असता बस अभावी ते तिथेच उभे असल्याचे सांगितले लगेच आमदारांना फोन करून कळविले. तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करून दिली. – सचिन पिदूरकर, निमणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here