घुग्घुस येथे रस्त्यांवर जमा होणारी व उडणारी धुळ उचलण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवा – मयूर कलवल

0
12

घुग्घुस येथे रस्त्यांवर जमा होणारी व उडणारी धुळ उचलण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवा – मयूर कलवल

घुग्घुस हे चंद्रपूर जिल्ह्य़ातील महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र आहे. मात्र सध्या येथे रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात धुळ जमा होवून सतत उडत असल्याने येथील नागरिकांचे जीवनमान गंभीररित्या प्रभावित झाले आहे. या समस्येमुळे नागरिकांना आरोग्य व वाहतूकीशी संबधित अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

समस्या व परिणाम
जमा झालेली धुळ घुग्घुसच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीमुळे व परिसरातील औद्योगिक उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात धुळ जमा होत आहे. आरोग्यावर होणारा परिणाम धुळ उडल्यामुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांचे विकार, त्वचाविकार व ॲलर्जी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. धुळ असल्यामुळे वाहनचालकांना रस्ता सष्ट दिसत नाही, परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पर्यावरणीय समस्या धुळ व परिसरातील औद्योगिक कचरामुळे परिसरातील हवा आणि पर्यावरणाच्या समतोल बिघडत आहे.

जमा झालेली धुळ उचलण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. सफाई यंत्रणा राबवावी. विशेष मशीन (व्हॅक्युम स्वीपिंग मशीन) वापरून रस्त्यावरील जमा धुळ नियमितपणे उचलली जावी. मॅन्युअल सफाई मोहीम स्थानिक प्रशासनाच्या मदतीने नियमित रस्ते स्वच्छता मोहीम राबवावी. धुळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी करावी. रस्त्यावरील परिसरातील औद्योगिक परिसरात नियमितपणे पाणी फवारणी केली जावी.
हिरवळ आणि वृक्षारोपण:धुळ व प्रदुषण रोखण्यासाठी रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडे लावावीत.
धुळ उचलण्याच्या यंत्रणांची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थाना अत्याधुनिक साफसफाई उपकरणे उपकरणे उपलब्ध करुन दिली जावीत.
घुग्घुस येथील नागरिक या समस्यामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत आपण तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देवून उपाययोजना केल्यास घुग्घुस मधील नागरिकांना दिलासा मिळेल. आ. किशोर जोरगेवारला निवेदनातून मयुर कलवलने मागणी केली आहे.

याप्रसंगी मयूर कलवल, माजी सरपंच राजकुमार गोदशेलवार, शिव सीने (शिंदे गट) शहर अध्यक्ष महेश डोंगे, अरुण दामेर, सावन मोरपका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here