राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी विजय ताजणे यांची नियुक्ती
घुग्घूस :- दहा डिसेंबर जागतिक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे चंद्रपूर येथे १७ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले त्यामध्ये सामाजिक क्षेत्रात मध्ये काम करणारे शोषणाविरुद्ध लढणारे विजयभाऊ ताजने यांना राष्ट्रीय मानव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल यांच्या मार्गदर्शनात सन्मान चिन्ह व नियुक्त पत्र देऊन यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती बद्दल प्रमोद अर्जुनकर, सुधाकर बोबडे,सुनिल वाघमारे, गणेश रोडे, योगेश पराते, बालाजी उपासे, सुरेश खडसे, उद्धव मोरे, व पंजाब मोरे यांनी अभिनंदन केले.