आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर घुग्घूसवासीयांचे हक्काच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण

0
23

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर घुग्घूसवासीयांचे हक्काच्या घरांचे स्वप्न होणार पूर्ण

प्रधानमंत्री आवास (शहरी) 2.0 योजनेत घुग्घूस शहराचा समावेश

 

आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून घुग्घूस शहराचे नाव प्रधानमंत्री आवास (शहरी) 2.0 योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे घुग्घूस वासीयांना आपल्या स्वप्नातील हक्काचे पक्के घर बांधण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
घुग्घूस हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असून, येथे कोळसा खाणी, लोहशुद्धीकरण प्रकल्प, सिमेंट कारखाने अशा मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आहेत. त्यामुळे येथे कामगार वर्ग आणि कमी उत्पन्न गटातील नागरिक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. परंतु, बहुसंख्य नागरिकांकडे पक्क्या घरांची सुविधा नाही. घुग्घूस शहराचे नाव यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेत नव्हते. त्यामुळे या योजनेतून लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी अनेकदा राज्य सरकार व केंद्र सरकारकडे मागणी केली होती. नवे सरकार स्थापन होताच त्यांनी पुन्हा एकदा सदर मागणी रेटून धरली त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे सदर योजनेत घुग्घूसचा समावेश करण्याची विनंती केली.
केंद्रीय मंत्री खट्टर यांनी या मागणीला तातडीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता घुग्घूस शहराचे नाव प्रधानमंत्री आवास (शहरी) 2.0 योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. परिणामी घुग्घूस नगरपरिषदेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
या निर्णयाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे आभार मानले आहेत. यामुळे घुग्घूसवासीयांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. आता पात्र नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज करावा आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here