जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ऑफलाइन सातबाऱ्यानेही होणार कापुस विक्री
तालुक्यातील वनजमीन व जमीन नोंद तफावतीच्या प्रलंबित विषयामुळे येथील शेतकऱ्यांचा सातबारा उतारा हा संगणकीकृत (ऑनलाईन) झालेला नाही. त्यामुळे जिवती तालुक्यातील शेतकर्यांना कोरपना येथील भारतीय कपास निगम (सीसीआय) केंद्रावर कापुस विक्री करण्याकरता अडचण निर्माण झाली होती.
शेतकर्यांची ही अडचण लक्षात येताच; मी तातडीने जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार तसेच राज्याच्या सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. राजेशकुमार मीना यांना सदर अडचणीची माहीती देऊन यासंदर्भात तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची विनंती केली.
त्यानुसार, शासनस्तरावरून जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हस्तलिखित सातबाराच्या (ऑफलाइन) आधारे त्यांना कोरपना येथील भारतीय कपास निगम (सीसीआय) केंद्रावर कापुस विक्रीची मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबाऱ्याअभावी सुद्धा आपला कापुस विक्री करता येणार आहे. या सकारात्मक निर्णयामुळे शेतकर्यांनात आनंद निर्माण झाला आहे.