“EVM” विरोधात सचिन भाऊ रामटेके यांच्या आमरण उपोषणाला आम आदमी पार्टी चंद्रपूरचा जाहीर पाठिंबा

0
22
“EVM” विरोधात सचिन भाऊ रामटेके यांच्या आमरण उपोषणाला आम आदमी पार्टी चंद्रपूरचा जाहीर पाठिंबा 
भारतीय लोकशाहीसाठी महत्त्वाचा मुद्दा बनलेल्या “EVM हटाओ, देश बचाओ” या आंदोलनाला आम आदमी पार्टी चंद्रपूरने जाहीर पाठिंबा दिला आहे. 6 डिसेंबर 2024 पासून आमरण उपोषणाला बसलेले श्री. सचिन भाऊ रामटेके यांच्या या आंदोलनाच्या मागण्या योग्य असून, ईव्हीएमसारख्या अपारदर्शक प्रणालीला हटवून पारंपरिक व विश्वासार्ह मतदान पद्धती लागू करणे गरजेचे आहे.
2017 मध्ये दिल्ली विधानसभा सदस्य सौरभ भारद्वाज यांनी विधानसभेत ईव्हीएम हॅकिंगबाबत थेट डेमो दिला होता. या डेमोने ईव्हीएम प्रणाली किती सहजपणे बदलता येऊ शकते, हे स्पष्ट केले. त्यांनी दाखवून दिले की मतदान प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वास टिकवण्यासाठी पारंपरिक मतपत्रिकांच्या पद्धतीला पुन्हा लागू करणे गरजेचे आहे.
या प्रसंगी आप चंद्रपूर अध्यक्ष योगेश गोखरे म्हणाले, “ईव्हीएमविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने देशभरात मोठी जनजागृती केली आहे. लोकशाहीला पारदर्शक ठेवण्यासाठी आणि जनतेचा मतदान यंत्रणांवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी हे आंदोलन गरजेचे आहे. आम आदमी पार्टी या लढ्यासाठी सचिन भाऊ रामटेके यांच्यासोबत खंबीरपणे उभी आहे.”
आप महिला अध्यक्ष तबस्सुम शेख यांनी सांगितले की, “महिलाही या आंदोलनाचा सक्रिय भाग बनत आहेत. ही केवळ तांत्रिक समस्या नाही, तर लोकांच्या हक्कांशी संबंधित मुद्दा आहे. सत्य आणि पारदर्शकतेसाठी आम्ही सदैव लढा देत राहू.”
युवांच्या बाजूने विचार व्यक्त करत आप युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे म्हणाले, “देशातील तरुण पिढीला निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहावा, यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. EVM हटवून पारंपरिक मतदान प्रणाली पुन्हा सुरू करणे, ही काळाची गरज आहे. सचिन भाऊंच्या आंदोलनासाठी आम्ही पूर्ण समर्थन देतो.”
आम आदमी पार्टी, चंद्रपूरच्या वतीने हे जाहीर करण्यात आले की या आंदोलनासाठी पक्षाच्या सर्व स्तरावर पाठिंबा देण्यात येईल आणि जनतेला या विषयावर जागरूक करण्यात प्रयत्न केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here