घुग्घुस येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करिता अलोट गर्दी
हे महामानवा घे तुझ्या लेकरांची आदराजंली
घुग्घुस शहरातील पृर्णाकृती पुतळासमोर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिसरातील ६८ वी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अलोट बौद्ध बांधव व परिसरातील विविध संघटना समाज बांधवानी गर्दी केली होती.
यावेळेस घुग्घुस येथील सांयकाळ रोजी वार्डा-वार्डातील सर्व विहार,आम्रपाली बौद्ध विहार, रमाबाई बौद्ध विहार,जैतवन महाबोधी बौध्द विहार,गौतम सिद्धार्थ बौद्ध विहार,यशोधरा बौद्ध आप-आपले विहारत सामुहिक बौध्द वंदना एकत्रित होवुन ही रॅली दोन,दोनच्या रांगात तसेच मशाल रॅली घेवुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमर रहे,अमर रहे कॅन्डल मार्च करुन एकत्रित येऊन भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस येथे एकत्रित जमा होवून शांतिपूर्वक गांधी चौक मार्ग,बँक ऑफ इंडीया ते तहसील कार्यालयासमोर नवबौद्ध स्मारक समिती परिसर येवुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो समोर दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.तसेच पुतळ्यासमोर मेणबत्ती प्रज्वलीत, पुष्पचक्र वाहून आदरांजली देण्यात आली. तसेच भावपूर्ण श्रध्दांजली गीत म्हणण्यात आले.
जय भीम युवा मंच घुग्घुसच्या माध्यमातून सांगण्यात आले की, हा दिवस आपल्याला त्यांचे विचार आत्मसात करण्याची आणि समाजात समता आणि बंधुतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा देतो. डॉ. आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते तर ते संपूर्ण देशाचे मार्गदर्शक व मशालवाहक राहिले.
याप्रसंगी बौद्ध समाज बांधव,परिसरातील विविध संघटना आवर्जून उपस्थित राहून शांतिपूर्वक अभिवादन करण्यात आले.