‘शाळे बाहेरची शाळा’ कार्यक्रमात कु. वेदिका दैवलकरची नागपूर आकाशवाणीवर मुलाखत
अनंता वायसे । हिंगणघाट
कोरोना काळात शाळा बंद आहेत पण विद्यार्थ्याचे शिक्षण सुरु राहावे, शिक्षणात खंड पडू नये याकरिता नागपूर विभागीय आयुक्त मा. संजीवकुमार साहेब यांनी प्रथम या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रमध्ये शाळे बाहेरची शाळा (रेडीओ कार्यक्रम) सुरु केलेला आहेत. त्या उपक्रमाकरिता प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन आकाशवाणी केंद्रावर प्रकाशित केले जातात. त्याचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद टेंभा गावची वर्ग 5 ची विद्यार्थी कु. वेदिका गजानन दैवलकर या चिमुकलीने आणि तिचे वडील गजानन दैवलकर यांनी आकाशवाणी केंद्र नागपूर या केंद्रावरून केलेल्या अभ्यासा विषयी मुलाखत दिली.सदर मुलाखत प्रथम संस्थेचे प्रतिनिधी श्वेता धोटे ,विनोद ठाकरे आणि मोरेश्वर खोंड यांनी टेंभा गावातील विद्यार्थिनीला संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल समस्त पालक वर्ग आणि गावकरी मंडळी आणि शाळेतील शिक्षक यांनी त्यांचे आभार मानले आपल्या गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रोषण केल्याबद्दल वेदिका आणि तिचे वडील गजानन दैवलकर याचे शाळेचे मुख्यध्यापक तडस सर, शिक्षकवर्ग, smc अध्यक्ष तुलसीदास दैवलकर, माजी सरपंच धनराज गराटे तंटा मुक्त समिती अध्यक्ष रणजीत ठाकरे, विनोद ठाकरे, मोरेश्वर खोंड आणि हनुमान हुलके यांनी भरभरून कौतुक केले.