विरूर स्टेशन रेल्वे रुळावर आढळला युवकाचा मृतदेह
सदर घटना ही घातपात असल्याचा कुटुंबीयांचा आरोप
विरूर स्टेशन :- प्रतिनिधी/अविनाश रामटेके
विरूर स्टेशन नजीक एक किलो मीटर अंतरावर विरूर
माकुडी दक्षिण मध्य रेल्वे मार्ग रुळावर एका युवकाचा मृतदेह सकळच्या सुमारास आढळल्याने गावात एकच खळबळ माजली असून यात घातपात असल्याचे मृतकच्या कटुंबानी आरोप लावल्याने यात संशय व्यक्त होत असून गावात कुजबुज होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पोलीस सूत्रा कडून मिळालेल्या माहिती नुसार राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील निलेश जितेंद्र डवरे अंदाजे वय 25 वर्ष हा बुधवार गुरुवार रात्रौ 9 वाजता आपल्या घरून बाहेर गेला. मात्र तो सकाळ पर्यंत घरी न पोहचल्याने त्याची शोधाशोध निलेश च्या आई वडिलांनी सुरू केली. तेव्हा विरूर कब्रस्तान जवळील जंगला लगत मध्य रेल्वे रुळावर शुक्रवार सकाळ च्या सुमारास त्याचा मृतदेह आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली.
याची माहिती निलेश च्या कुटुंबियांना व पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून तपासणी केली असता धडापासून शरीर व पाय बाजूला पडलेले आढळले व काही अंतरावर रुळाच्या खाली झुडपामध्ये रक्त रेतीने लपविल्याचे दिसून आले. तेव्हा घटनेची प्राथमिक अंदाजित परिस्थिती पाहता मृतक कुटुंबीयांनी माझ्या मुलाची आत्महत्या नसून हा घातपातच असल्याचा आरोप लावला. त्यामुळे गावात वेगळ्याच चर्चेला पेव फुटले व पोलिसांनी तपासाचे चक्र गतीने फिरविले.
सर्वप्रथम विरूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यु ची नोंद करून फॉरेन्सिक टीम व श्वान पथक बोलावून गंभीर रित्या तपास केला. विचारपूस करण्याकरिता तीन युवक व एका महिलेला बोलावून विचारपूस करण्यात आले. खरी परिस्थिती काय आहे हे लवकरच समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सदर तपास अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर, सहायक पोलिस निरीक्षक संतोष वाकडे, पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार, विजू मुंडे, अतुल सहारे हे करीत आहे