६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागवंश युथ फोर्सचा रक्तदान उपक्रम: ६८ रक्तदात्यांची अभिवादनात्मक आदरांजली
राजुरा, ६ डिसेंबर २०२४:
आजच्या विशेष तारखेला अर्धा डझन (०६), एक डझन(१२)आणि दोन डझन(२४) (०६/१२/२०२४) नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था, राजुरा यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे ६८ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.
संविधान चौक, राजुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती व अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर दोन रांगेत नियोजनबद्ध रॅलीद्वारे बुध्दभूमी, राजुरा येथे त्रिशरण व पंचशील स्वीकारत अभिवादन करण्यात आले. याच ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तसेच कोमल फुसाटे व सुनील मेश्राम यांनी भोजन दान केले.
नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था नेहमीच समाजोपयोगी कार्यात आघाडीवर असून, कोरोनाकाळात गरजूंना अन्नधान्य वाटप, समाज प्रबोधन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वृक्षारोपण अशा उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपली आहे. विशेष म्हणजे, रक्तदान हे संस्थेचे प्रमुख कार्य असून, मागील सात वर्षांपासून हे उपक्रम यशस्वीरीत्या राबवले जात आहेत.
कार्यक्रमातील मान्यवरांचा सहभाग:
महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक गणेश तुपेकर, वैद्यकीय अधिकारी यश जोगी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ उत्तम सावंत, परिचारक दुर्गादास गिरे, पल्लवी पवार, पूजा गायकवाड व चालक रुपेश घुमे यांनी रक्तदान प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रम यशस्वी करणारे प्रमुख कार्यकर्ते:
अमोल राऊत, धनराज उमरे, रवी बावणे,रवी झाडे, नूतन ब्राम्हणे,निखील वनकर, युवराज कातकर, सुरेंद्र फुसाटे, जय खोब्रागडे, प्रणित झाडे, सागर चाहांदे, आकाश नळे, प्रमोद देठे, राहुल सूर्यवंशी, गौरव रामटेके, सुधीर मेश्राम, राजहंस वानखेडे,नितीन कांबळे,गणेश देवगडे,दिक्षित मेश्राम,अविनाश सुर्यवंशी,आदर्श तेलंग, संघपाल देठे, राहूल अंबादे, उत्कर्ष गायकवाड,,डॉ.बांबोळे व अन्य कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
या उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेत समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्याचा संदेश दिला. नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था रोपटे असुन भविष्यातही सामाजिक उपक्रम राबवून वटवृक्ष होईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.