घुग्घुस येथील आ.जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात महामानवास वाहिली आदरांजली

0
168

घुग्घुस येथील आ. जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात महामानवास वाहिली आदरांजली

घुग्घुस येथील यंग चांदा बिग्रेड संस्थापक व आ.किशोरभाऊ जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार, माल्यार्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आले.

जेष्ठ नागरिकांकडून बोलण्यात आले की,अस्पृश्यता, दलितांचे उत्थान, महिला आणि मजुरांवरील भेदभाव यांसारख्या समाजात प्रचलित असलेल्या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवणारे बाबासाहेब हे भारतीय राज्यघटनेचे आधारस्तंभ मानले जातात. बाबासाहेबांना संविधानाच्या माध्यमातून हा देश समता, सद्भावना आणि बंधुतेच्या भावनेने रुजवायचा होता. परदेशात जाऊन अर्थशास्त्राची पदवी मिळवणारे डॉ. आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत. आंबेडकर परदेशातून पदवी घेऊन भारतात आले तेव्हा 1926 साली ते पहिल्यांदा मुंबई विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.

संजय तिवारी,इमरान खान,राजकुमार गोडसेलवार,साजन गोहणे,अनिल बाम,शंकर पुनम,श्याम आगदारी,मुन्ना लोडे,मयुर कलवल,महेश लट्टा,श्रीकांत मिसाला, मल्लेश बल्ला,अरुण दामेर,मिथुन मानकर, सौ. उषाताई गौतम आगदारी,नितु जयस्वाल,सुनंदा सोदारी,कामिनी देशकर,भारती सदारी,विना गुच्छायत,शरदा पोन्नाला,सुरेखा तोडासे,निता मालेकर,ज्योति बावरे व आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here