नकोडा येथे सरकारी जागेवरील अतिक्रमण प्रकरण – 84 घरांना नोटीस
घुग्घुस तहसील कार्यालयात विशेष बैठक आयोजित
नकोडा गावातील सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याच्या प्रकरणावर शासनाने 84 घरमालकांना अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा बजावल्याने गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या संदर्भात आज घुग्घुस तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत घरमालकांनी आपापल्या समस्या आणि मागण्या मांडल्या.
तहसील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक
प्रकरणावर अधिकृत चर्चा करण्यासाठी आणि गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उद्या तहसील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीकडून आश्वासन
ग्रामपंचायतीच्या वतीने गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल. संबंधित नागरिकांना न्याय मिळावा आणि त्यांचे हित संरक्षित राहावे यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
या बैठकीला माजी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, सरपंच किरण बांदुरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, माजी उपसरपंच हनिफ मोहम्मद तसेच इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.