आमदार देवराव भोंगळे यांचे हस्ते जोगापुर यात्रेचा शुभारंभ
दर्शनार्थींकरता सोईस्कर नियोजन करण्याचे वन विभागाला सुचना…
राजुरा तालुक्यातील श्री जोगापुर हनुमान मंदिरात पवित्र मार्गशीर्ष मासाच्या आरंभापासून सुरू होणाऱ्या जोगापुर यात्रेचे आज सकाळी वनाधिकारी व दर्शनार्थींसह शुभारंभपर उद्घाटन केले.
महसुली रिठ असलेल्या श्री जोगापूर हनुमान मंदिरात अनेक वर्षांपासून मार्गशीर्ष मासारंभापासून यात्रा भरते आहे. सदर यात्रेस दरवर्षी लाखोंच्या संख्येने दर्शनार्थी येत असतात. परंतू हा संपूर्ण परिसर वनव्याप्त असल्याने अतिशय संवेदनशील आहे. याठिकाणी जंगली श्वापदांचा वावर असतो त्यामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याकरता वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना व बंदोबस्त, दर्शनार्थींकरता शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था यांसह परीसरातील गावांशी योग्य समन्वय ठेवून ही पवित्र यात्रा सकारात्मक वातावरणात पार पडेल व दर्शनार्थींना सुलभ होईल अशा पद्धतीने यात्राकाळाचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधितांना केल्या.
यावेळी माझ्यासमवेत उपविभागीय वनअधिकारी पवनकुमार जोंग, तहसीलदार ओमप्रकाश गौंड, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, भाजपचे शहराध्यक्ष सुरेश रागीट, तालुका महामंत्री दिलीप गिरसावळे, शहर महामंत्री ॲड. नितीन वासाडे, विनोद नरेन्दुलवार, राजकुमार डाखरे, क्षेत्र सहाय्यक संतोष संगमवार, क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते यांसह इतर वनरक्षक तसेच वनमजुर व दर्शनार्थींची उपस्थिती होती.