डाखरे महाराज फाउंडेशन अंतर्गत स्वराज एज्युकेशन सेंटर भातकुली येथे “किसान ड्रोन ऑपरेटर कोर्स” ची सुरुवात…
घुग्घूस :- डाखरे महाराज फाउंडेशनच्या अंतर्गत स्वराज एज्युकेशन सेंटर, भातकुली येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार ,उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र अमरावती च्या सहयोगाने “किसान ड्रोन ऑपरेटर कोर्स” ची सुरुवात करण्यात आली आहे.
या जिल्हास्तरीय कौशल्य विकास योजनेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार ,उद्योजकता व मार्गदर्शन केंद्रा च्या सहायक आयुक्त बारस्कर मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी कौशल्य विकासाच्या महत्त्वावर भाष्य करताना ड्रोन तंत्रज्ञानाच्या शेतीतील उपयोगाबद्दल आणि त्याद्वारे होणाऱ्या फायद्यांवर प्रकाश टाकला. सोबतच कृषीविभागाचे प्रमोद खर्चान सर, कौशल्य विभागाचे प्रवीण जी बांबोले सर, सोहळे सर आणि भातकुली या गावातील मावळे सर, श्याम दादा सनके, सुरेंद्रजी सीरसाट, बैलमारे दादा आणि डाखरे महाराज फाऊंडेशन चे डायरेक्टर इंजिनिअर धनंजय डाखरे सर व मॅनेजिंग डायरेक्टर सौ. संप्रदा डाखरे मॅम उपस्थीत होत्या. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रा मध्ये सर्व प्रथम हा कोर्स सहायक आयुक्त बारस्कर मॅडम यांच्या अथक प्रयत्नातून भातकुली येथे राबवण्यात येत आहे या आर्थिक वर्षामध्ये 90 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे ध्येय आहे. 30 विद्यार्थ्याची पहिली बॅच 26 नोव्हेंबर पासून सुरू झालेली आहे.
कोर्सची वैशिष्ट्ये:किमान कौशल्य विकास योजना: जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी तयार केलेले विशेष प्रशिक्षण आणि हे प्रशिक्षण मोफत आहे.
आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान: शेती व्यवस्थापन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोन ऑपरेटिंगचे कौशल्य शिकवले जाईल.
रोजगार व उद्योगाच्या संधी: ग्रामीण तरुणांसाठी तंत्रज्ञानाधारित रोजगार निर्माण करणे.कोर्सचा उद्देश:
ग्रामीण भागातील शेतकरी आणि तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान व कौशल्य देऊन शेती व्यवस्थापन सुधारणा करणे आणि शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवणे.डाखरे महाराज फाउंडेशनच्या या पुढाकारामुळे शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाचा नवीन अध्याय सुरू होणार असून, शेती अधिक प्रभावी आणि प्रगत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेतीत प्रगतीसाठी सहभागी व्हा
हा कोर्स ग्रामीण भागातील शेतकरी व तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. आधुनिक शेतीकडे वाटचाल करताना या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे सांगितले.