जड वाहतुकीवर तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आपची मागणी…
पोंभूर्णा ते केळझर मार्गावर सूरजागड कडून येणाऱ्या वेगवान व ओव्हरलोड लोहखनिज वाहनामुळे पोंभुर्णा – देवाडा – जाम तुकुम – सुशी दाबगाव या गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. तसेच दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण भरपूर वाढत चालले आहे.
या करिता आम आदमी पार्टी चे युवा जिल्हा संघटन मंत्री मनिष राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी खालील मागण्या करण्यात आल्या:
1. वाहतुकीचा वेळ रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत मर्यादित करणे.
2. रोज सकाळी संपूर्ण रस्त्याला पाणी मारणे.
3. जड वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण करणे.
4. लोहखनिज वाहनांवर कव्हरिंग ताडपत्री लावणे बंधनकारक करणे.
5. प्रदूषणामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे नुकसान भरपाई देणे.
6. स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे.
आम आदमी पार्टी ने प्रशासनाला विनंती केली की या मागण्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा जनतेच्या हितासाठी आंदोलन केल्या जाईल.
निवेदन देताना आदित्य नंदनवार युवा जिल्हा सचिव, तब्बसुम शेख शहर महिला अध्यक्ष, अनुप तेलतुंबडे युवा जिल्हा उपाध्यक्ष उपस्थित होते.