नामांकित शाळेतील आदिवासी अल्पवयीन विद्यार्थीनी बलात्कार प्रकरण
आदिवासी नेत्यांच्या जोरदार प्रचारामुळे सुभाष धोटे बॅकफूटवर
राजुरा, ता.प्र. – राजुरा येथील नामांकित शाळेतील 14 अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणाविषयी आमदार सुभाष धोटे यांचेवर गावागावात होणा-या सभेत जोरदार टीका करण्यात येत आहे. आदिवासी नेते यावर काॅंग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांचेवर प्रखर टीका करीत असल्याने पुन्हा एकदा हा मुद्दा प्रचारात समोर आला आहे.
या आदिवासी विद्यार्थीनी व त्यांचे पालकांनी पोलिसांत तक्रार केल्यावर सरकार तर्फे अत्याचारग्रस्त मुलींना पैसे मिळतात, म्हणून चंद्रपूर येथे पत्रकार परिषदेत घेऊन काॅंग्रेस नेते सुभाष धोटे, विजय वडेट्टीवार यांनी यांनी आरोप केला होता. त्यावर आदिवासी समाजच नव्हे तर सर्व समाजातून जोरदार प्रतिक्रिया उमटून या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात आणि या सर्व काॅग्रेस नेत्यांविरोधात जोरदार आंदोलन झाले होते.
या प्रकरणी संस्थेतील तिन कर्मचारी आरोपी असूनते जेल मध्ये आहेत. सुभाष धोटे अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या शाळेची मान्यता सरकारने काढून टाकली होती आणि येथील मुलींना इतर शासकीय शैक्षणिक शाळेत दाखल करण्यात आले होते. आदिवासी बांधवांनी या अपमानाचा बदला घेण्याचे आवाहन आदिवासी गावे व पाड्यावर करण्यात येत आहे. गेली पाच वर्षे आमदार सुभाष धोटे यांनी ग्रामीण भागातील रस्ते, पांदन रस्ते, पाणी, आरोग्याच्या सोयी याबाबत नागरिक हैराण झाल्यामुळे बॅकफूट वर असतांना अँटी इन्कमबन्सी चा सामना काॅंग्रेस पक्षाचे उमेदवार सुभाष धोटे करीत असतांना आता या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.