राजुरा विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार गजानन गोदरू पाटील जुमनाके यांची विजयाकडे वाटचाल

0
11

राजुरा विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार गजानन गोदरू पाटील जुमनाके यांची विजयाकडे वाटचाल

 

राजुरा – विधानसभा क्षेत्रामध्ये धोटे – भोंगळे – चटप – जुमनाके यांच्यामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.

काँग्रेस कडून विद्यमान आमदार व जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुभाष धोटे भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे आणि शेतकरी संघटनेकडून माजी आमदार अँड. वामनराव चटप आणि वंचित बहुजन आघाडी गोंडवाना गणतंत्र पार्टी महासत्ता परिवर्तन आघाडीचे उमेदवार गजानन गोदरू पाटील जुमनाके यांच्या मध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे.

2019 मध्ये गजानन पाटिल जुमनाके यांचे वडील आणि तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य स्व. गोदरू पाटील जुमनाके यांनी वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती तब्बल 15 दिवसाच्या कालावधीत 43000 हजारांचे मत्ताधिक्य घेतले होते. कोरोणा काळामध्ये स्व. जुमनाके यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा गजानन पाटिल जुमनाके यांनी राजुरा विधानसभेच्या राजकारणात उडी घेतली. गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. संघटन कौशल्य, तगडा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करून राजुरा विधानसभेवर गोंडवाना – वंचितचा झेंडा फडकविण्यासाठी ते सज्ज झाले.

राजुरा विधानसभा मतदार संघात आदिवासी मतदार निर्णायक ठरत असतो विधानसभेच्या राजकारणामध्ये गजानन गोदरू पाटिल जुमनाके यांचे आदिवासी मतदारांवर प्राबल्य आहे. विधानसभेची निवडणूक लागली 2019 प्रमाणे याही निवडणुकीत जुमनकेंच्या मागे दलीत मतांवर प्राबल्य असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली ताकद गजानन गोदरू पाटील जुमनाके यांच्या पाठीमागे उभी केली.

सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, यात राजुरा विधानसभा मतदार संघामध्ये प्रचार रॅली, कॉर्नर सभा आणि डोअर टू डोअर प्रचारामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी महासत्ता परिवर्तन आघाडीचे उमेदवार गजानन गोदरू पाटिल जुमनाके यांनी आघाडी घेतली आहे. जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघता यंदा राजुऱ्यात वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या उमेदवाराचा विजय पक्का मानला जात आहे.

राजुरा विधानसभा मतदार संघामध्ये आदिवासी समाज जुमनाके यांच्या विजयासाठी एकवटला आहे, सोबतच दलीत, मुस्लिम इतरही समाजाचे मतदान जुमनाके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने भाजप, काँग्रेस आणि शेतकरी संघटनेला गजानन गोदरू पाटील जुमनाके जबर धक्का देण्याच्या तयारीत आहे.

जुमनाके यांची प्रचार यंत्रणा ही तगडी आहे, वंचित बहुजन आघाडी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला समन्वय ही जुमनाकेंच्या प्रचार यंत्रणेची जमेची बाजू आहे. हे चित्र बघता जनतेमधून जुमनकेंच्या विजयाचा सुर उगवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here