आमदार किशोर जोरगेवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा – उपमुख्यमंत्री पवन कल्याण
रोड शोच्या माध्यमातून पवन कल्याण यांचे चंद्रपूरकरांना आवाहन
आंध्रप्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पावर स्टार पवन कल्याण हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी रोड शोच्या माध्यमातून त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन चंद्रपूरकरांना केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, भाजप विधानसभा अध्यक्ष प्रमोद कडू, अजय जयसवाल, रघुवीर अहिर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
साडे तीन वाजता उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या रॅलीला शहरातील बागला चौकातून सुरुवात झाली. यावेळी पावर स्टार पवन कल्याण यांना पाहण्यासाठी नागरिकांनी रोडच्या दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी पवन कल्याण यांनी सर्वांना अभिवादन करत आमदार किशोर जोरगेवार यांच्या समर्थनार्थ मत मागितले.
तत्पूर्वी, पवन कल्याण यांचे मोरवा विमानतळावर आगमन झाल्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
रोड शोमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
बागला चौकातून सुरू झालेल्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांसह चंद्रपूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवकांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून रोड शो ममध्ये सहभाग घेतला तर महिलांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी “अम्मा का टिफिन” आणि माता महाकाली मूर्ती देऊन पवन कल्याण यांचे स्वागत केले.
हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत घुग्घूस येथे पदयात्रेतून प्रचार
घुग्घूस येथे काल आमदार किशोर जोरगेवार यांनी पदयात्रेतून प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार किशोर जोरगेवार यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी हंसराज अहिर यांनी केले. यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असून, त्यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी प्रचार केला जात आहे. पदयात्रा आणि बैठकींच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आणि आमदार किशोर जोरगेवार यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन करत आहेत.
दरम्यान सायंकाळी सात वाजता घुग्घूस शहरातील टिळक नगर येथून या पदयात्रेला सुरुवात झाली. नंतर दसरा मैदान, जे.जे. आयटीआय, वराडे हॉस्पिटल, जामा मस्जिद, घुग्घूस पोलीस स्टेशन, एस.सी.सी. रोड, मिरची मार्केट, फटाका कॉर्नर, पंचशील चौक मार्गे ही पदयात्रा नगर परिषदेत येथे पोहोचली.यावेळी घुग्घूस वासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.