राजुरा विधानसभा निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात…
राजुरा, ४ नोव्हे. :- आज विधानसभा निवडणुकीत नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदार संघात तीन उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला असून आता १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
उमेदवार, त्यांचे पक्ष व निवडणूक चिन्ह खालीलप्रमाणे आहेत…
१) अभय मारोती डोंगरे – बहुजन समाज पार्टी – हत्ती
२) देवराव विठोबा भोंगळे – भारतीय जनता पार्टी – कमळ
३) सुभाष रामचंद्रराव धोटे – इंडियन नॅशनल काँग्रेस – हात
४) सचिन बापूराव भोयर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रेल्वे इंजिन
५) गजानन गोदरू पाटील जुमनाके – गोंडवाना गणतंत्र पार्टी – करवत
६) ऍड. वामनराव सदाशिव चटप – स्वतंत्र भारत पक्ष – शिवण यंत्र
७) प्रिय बंडू खाडे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) – विटा
८) भूषण मधुकरराव फूसे – संभाजी ब्रिगेड पार्टी – गॅस सिलेंडर
९) मंगेश हिरामण गेडाम – पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) – फळांची टोपली
१०) किरण गंगाधर गेडाम – अपक्ष – ऊस शेतकरी
११) प्रविन रामराव कुमरे – अपक्ष – खाट
१२) चित्रलेखा कालिदास धंदरे (चापले) – अपक्ष – नागरिक
१३) निनाद चंद्रप्रकाश बोरकर – अपक्ष – ऑटो रिक्षा
१४) प्रवीण रामदास सतपाडे – अपक्ष – शिट्टी
असे चौदा उमेदवार विविध पक्षांकडून व अपक्ष निवडणुकीला सामोरे जात असून माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे यासह जनवादी पक्षाच्या श्रीमती रेशमा चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.