बिथरलेल्या विरोधकांच्या थयथयाटाची किव येते – शहराध्यक्ष अरविंद डोहे

0
31

बिथरलेल्या विरोधकांच्या थयथयाटाची किव येते – शहराध्यक्ष अरविंद डोहे

वायरल ऑडिओची सत्यता पडताळून दोषीवर कडक कार्यवाही करण्याची भाजपची मागणी

 

गडचांदूर, दि. ०४
राजुरा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे संचालक श्री. देवरावजी भोंगळे यांनी राजुरा विधानसभेत गडचांदूर शहरासह ठिकठिकाणी मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र नावाने सेवा कार्यालये उघडली. त्या माध्यमातून मागिल दिड-दोन वर्षांपासून या भागातील गोरगरिब नागरिकांना विविध शासकीय योजनांचा निःशुल्क रीतसर लाभ, माहीती आणि मोफत महाआरोग्य शिबीरांचे आयोजन ते करत असतात.
परंतू स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांच्या चांगल्यात वाईट शोधण्याची वाईट सवय जडलेल्या विरोधकांच्या निरर्थक थयथयाटाची किव येते. असा घणाघात भाजपाचे शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी केला आहे.

महायुतीचे उमेदवार श्री. देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच विरोधकांच्या पाया खालची जमीन सरकली आहे. त्यामुळे ते त्यांच्यावर निरर्थक व खोटे आरोप करून नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत.
अलिकडेच समाज माध्यमांमध्ये कुण्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांने एका खाजगी कार्यालयात काम केलेल्या युवकाशी बोगस मतदार नोंदणीवरून झालेले संभाषण वायरल होत आहे. आणि त्यामधे जाणिवपुर्वक मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र गडचांदूरचे नाव गोवण्यात येत आहे. परंतू त्यांचा हा दावा संपुर्ण खोटा असुन या भागातील जनतेच्या सेवेसाठी नवा अध्याय सुरू करणाऱ्या मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात असे काम केव्हाच झाले नाही, होणार नाही. तथापि याच गडचांदूर शहरात अनेकांचे कार्यालये आहेत त्यामुळे त्या ठिकाणी असा गैरप्रकार झाला असेल, तर त्याची तातडीने सखोल चौकशी करून दोषींना गजाआड केले पाहीजे अशी आमची मागणी आहे. तथापि त्या तथाकथित ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून तो मुलगा कोण? त्याने गडचांदूर शहरातील नेमक्या कोणत्या कार्यालयात काम केले, त्याला कामावर लावणारा तो शुभमभाऊ कोण? याचीही चौकशी करण्यात यावी. खरंतर आमच्या गडचांदूर येथील मा.ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात कोणत्याही बाहेर गावातील मुलांना कामावर ठेऊन त्यांचेकडून बोगस मतदार नोंदणी करण्यात आलेली नाही. परंतू फेक नरेटिव्हच्या भरोशावर बसलेल्या संधीसाधू कॉंग्रेस नेत्यांना खोटनाटे आरोप करण्याशिवाय दुसरे काम उरले नाही. ज्या गोष्टींशी आमचा दुरान्वयेही संबंध नसतो अशाजागी आमचे नाव पुढे करून ते बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. परंतू जनतेला सेवा देणारे कोण आणि शिव्या देणारे कोण यांची चांगलीच ओळख झाली असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच अशा खोटारड्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. तथापि पराभवाच्या भीतीने बिथरलेल्या कॉंग्रेस नेत्यांना जागोजागी देवराव भोंगळेच दिसत असल्याने त्यांनी लवकरात लवकर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा खोचक सल्ला ही त्यांनी विरोधकांना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here