अपघातग्रस्त युवकांकरिता देवदूतासारखे धावले भूषण फुसे
राजुरा बल्लारपूर मार्गावर पेट्रोल पंपाजवळील घटना
भूषण फुसे यांच्या समयसूचकतेने अपघातग्रस्ताला मिळाले वेळेत उपचार
राजुरा – बल्लारपूर मार्गावर ओम साई मंगल कार्यालयाच्या समोर गेल्यावर येणाऱ्या पेट्रोल पंप जवळ एक दुचाकीस्वार रस्त्यावर पडलेला दिसला. काही लोक अपघातग्रस्त दुचाकीस्वाराकडे पाहत होते. तितक्यातच राजूराहून चंद्रपूरकडे कार ने निघालेले सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे याना रस्त्यावर लोक जमा झालेले दिसले. कार थांबवत भूषण फुसे यांनी बघितले कि अपघातग्रस्त युवकाच्या डोक्यातून रक्त वाहत आहे. त्याचा डोक्याला जबर मार लागलेला दिसला. अपघातग्रस्ताची विचारपूस करत १०८ रुग्णवाहिकेला फोन करून तात्काळ घटनास्थळी बोलाविले. स्वतः आणि जमा झालेल्या होतकरू लोकांच्या साहाय्याने भूषण फुसे यांनी अपघातग्रस्त युवकाला रुग्णवाहिकेत ठेवले व स्वतः ग्रामीण रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना भेटून योग्य उपचाराची विनंती केली. अपघातग्रस्त लोकांच्या मदतीकरिता सहजासहजी कुणीही सामोरे येत नाही. मात्र भूषण फुसे यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि जखमी दुचाकीस्वाराचा आता उपचार सुरु झाला आहे. मात्र दुचाकीस्वाराचे नाव कळू शकले नाही घटनास्थळी MH 34 BW 7120 या क्रमांकाची दुचाकी आढळून आली. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीनुसार भूषण फुसे जखमी युवकांकरिता देवदूतासारखे धावून गेले. भूषण फुसे यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.