मनसेचे सचिन भोयर यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
२९ तारखेला दाखल केला निवडणूक नामांकन अर्ज
राजुरा :- ज्यांना भविष्याची चिंता आहे ते लोक सचिन भोयर सोबत आहे. आणि ज्यांना भविष्याची चिंता नाही ते प्रस्थापित उमेदवारांसोबत आहे. असे म्हणत मनसेचे अधिकृत उमेदवार सचिन भोयर यांनी २९ तारखेला राजुरा मध्ये विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी नामांकन अर्ज भरला.
माझ्या आयुष्यातील 21 वर्ष मी लोकसेवेला दिले आहे. सेवा करत असतांना वेळ-काळ, तहान-भूक कधी पाहिली नाही निरंतर सेवा केली. मी आमदार, खासदार, मंत्र्या संत्र्याचा पोरगा नाही. एका सर्वसामान्य कुटुंबातील असून देखील मी आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी विधानसभा निवडणुक सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी, शेतकरी, कामगारांसाठी लढत आहे. मी काम करण्यात, सेवा देण्यात कुठेच कमी नाही. मी माझ आयुष्यचं तुम्हाला अर्पण केले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून रॅली मिरवणूक काढण्यात आली. संविधान चौक ते राजुरा तहसील कार्यालय पर्यंत शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. नामांकन अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने युवकांची पदाधिकाऱ्यांची व नागरिकांची उपस्थिती होती.
युवकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून ‘अबकी बार युवा आमदार’ चे नारे लावत पूर्ण राजुरा विधानसभेचे लक्ष वेधून घेतले. युवकांनी ही निवडणूक हाती घेतली आहे. यामुळे प्रस्थापित उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
असं वातावरण या राजुरा विधानसभेत चित्र दिसत आहे.