राजुऱ्यात गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीची नामांकन रॅली ठरली लक्षवेधी
गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी च्या वतीने राजुऱ्यात गजानन पाटील जुमनाके यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल…
राजुरा :- विधानसभा क्षेत्रामध्ये यंदा चौरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे, 2019 मधील निवडणूकीत, गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी कडून तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य स्व. गोदरु पाटील जुमनाके यांनी विधानसभेची निवडणूक लढवत तब्बल 45 हजारांचे मताधिक्य घेतलं होतं. कोरोणा काळात त्यांचं निधन झालं त्यानंतर त्यांचे चिरंजीव आणि जिवतीचे माजी नगराध्यक्ष गजानन गोदरू पाटील जुमनाके यांनी विधानसभेच्या राजकारणात उडी घेतली. संघटनात्मक बांधणी करत असताना त्यांनी सामान्य माणसासोबत चांगला जनसंपर्क ठेवला आहे.
जुमनाके यांच्याकडे संघटनात्मक कौशल्य, कार्यकर्त्यांची मजबूत फडी आणि तगडा जनसंपर्क असल्याने 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीने राजुऱ्यातून त्यांना मैदानात उतरवले आहे.
दिनांक 29 ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडी समर्पित गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून शक्ती प्रदर्शन करत गजानन पाटील जुमनाके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.असिफाबाद रोड वरील कर्नल चौक ते उपविभागीय कार्यालय राजुरा इथपर्यंत नामांकन महा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली नंतर सम्राट हॉल राजुरा येथे भव्य विजय संकल्प सभेचे आयोजन करून गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे रणसिंग फुंकले आहे.
यावेळी नवा संकल्प, नवा चेहरा हा स़ंकल्प करुन प्रस्थापित विरुध्द विस्थापितांचे नेते श्री गजानन जुमनाके हेच शोषितांना न्याय मिळून देवू शकतात असे विजय संकल्प सभेत ठरवून त्यांना बहुमतांनी विजय करावे असे आव्हान केले.
राजुरा विधानसभा क्षेत्र हा बहुतांश भाग पंचायत क्षेत्रविस्तारात समाविष्ट होणारा भाग आहे. आदिवासी समाज बहुसंख्येने आहे हा मतदार आज आपल्या हक्क अधिकाराविषयी जागृत होवून आदिवासी समाज बऱ्यापैकी जुमनाके यांच्या बाजूने उभा आहे. त्यामुळे ही निवडणूक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. शेवटच्या क्षणामध्ये वंचित बहुजन आघाडीनेही जुमनाके पाठिंबा जाहीर केल्याने दलित समाजही त्यांच्यासोबत गेल्याने भाजप – काँग्रेस आणि शेतकरी संघटनेला गजानन पाटील जुमनाके यांची उमेदवारी डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य, कृषी, रस्ते, रोजगार, पेसा क्षेत्रातील विविध पदभरती, योग्य हमी भाव, सिंचन अशा विविध क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचे आवाहन यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार गजानन पाटील जुमनाके यांनी केले.
विजयी संकल्प सभेसाठी गो़ंडवाना गणतंत्र पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष बापुराव मडावी. विशेष उपस्थिती गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोंड अनिलसिंह धूर्वे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेबुब शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निशिकांत सोनकांबळे, माजी जिल्हापरिषद सदस्या सतलूबाई जुमनाके, माजी नगरसेविका राधाबाई आत्राम, वंचित बहुजन आघाडीचे गुरुदास झाडे, सुरेंद्र रायपुरे, श्री चंद्रागडेजी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिवती तालुकाध्यक्ष हनुमंत कुमरे, कोरपना तालुका अध्यक्ष मेजर बंडुजी कुमरे, राजुरा तालुकाध्यक्ष अरुण उदे, गोंडपिपरी तालुकाध्यक्ष प्रदीप कुळमेथे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.