ब्रिजभुषण पाझारे यांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट…
माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्यासाठी चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी विनंती करण्यासाठी लोकनेते ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जेपी नड्डा यांना भेटण्याचा योग आला. श्री. जेपी नड्डाजी यांच्याशी संवाद साधताना अत्यंत आनंद झाला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या पुढील प्रवासात आत्मविश्वासाची नवी ऊर्जा मिळाली.
सुधीरभाऊंनी यावेळी घेतलेली भूमिका अत्यंत प्रेरणादायी होती. भाऊंनी “कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो” असे सांगताना एक निष्ठावंत कार्यकर्त्याच्या परिश्रमांची जाणीव ठेवावी असे ठासून नमूद केले. पक्षहित आणि राष्ट्रहित याला सर्वोच्च मानत ज्या पद्धतीने भाऊंनी आपल्या भूमिकेचा ठसा उमटवला, त्यांच्याबद्दलचा आदर आणि अभिमान माझ्या मनात अधिकच वाढला.
सुधीरभाऊंसारख्या नेत्याच्या सहकार्याने आणि त्यांच्याच मार्गदर्शनामुळेच मी दिल्लीपर्यंत पोहोचू शकलो, जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाजी यांची भेट घेतली, तेव्हा मनावरील ताण दूर झाला आणि पक्षाच्या सशक्त नेतृत्वाचा अभिमान अधिकच बळकट झाला. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान आहे. विशेषतः सुधीरभाऊंसारख्या निष्ठावंत आणि पक्षप्रेमी नेत्याचा कार्यकर्ता असण्याचा गर्व आहे. हे प्रेम आणि आधारच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे.
सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी करिता चढाओढ दिसून येत आहे. याच पार्श्वूभूमीवर पाझारे यांनी ना. मुनगंटीवार यांच्यासमवेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेतली. व त्या भेटीचे हितगुज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.