वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सतीश मुरलीधर मालेकर २८ ऑक्टोबरला दाखल करणार उमेदवारी अर्ज
हजारोंची राहणार उपस्थिती ; कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह
मुल येथील उपविभागीय कार्यालय येथे दाखल करणार अर्ज
मुल, दि. 26 – मुल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेचा आवाज व शिक्षकाचे लाडके नेतृत्व,ओबीसीच्या आरक्षणासाठी झटणारे व्यक्तिमत्व माननीय श्री सतीश मुरलीधर मालेकर सर यांनी येत्या सोमवारी, दि. २८ ऑक्टोबरला हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच चाहते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सतीश मुरलीधर मालेकर सर सोमवारी सकाळी 10.00 वाजता मुल येथील उपविभागीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतील पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवब्रिगेड संघटनेतील कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण सादर आमंत्रित आहात. यावेळी अर्ज भरण्यापूर्वी मालेकर सर मतदारसंघातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन गांधी चौक मुल येथुन उपविभागीय कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यासाठी निघणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या साक्षीने व बाळासाहेबांच्या आशीर्वादाने निवडणुकीतही ते विजयासाठी सज्ज झाले आहेत.