जिल्हाधिकारी यांची भोयेगाव धानोरा एसएसटी स्थिर पथकाला भेट…

0
9

जिल्हाधिकारी यांची भोयेगाव धानोरा एसएसटी स्थिर पथकाला भेट…

कोरपना प्रतिनिधी :- सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. जिल्हा प्रशासन संपूर्ण पणे निवडणूक शांततेने सुव्यवस्थेने होण्याकरिता व विधानसभा निवडणूक 2024 च्या अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहे. निवडणुकीमध्ये रोख, अवैद्य वस्तू, शस्त्रे असामाजिक संघटनाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी एसएसटी पथक कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरपणा तालुक्यात भोयगाव, वनोजा, कोळशी खुर्द व परसोडा फाटा असे एकूण चार एसएसटी पथक तयार करण्यात आले. त्यापैकी काल दिनांक 22 ऑक्टोबर 2024 ला सायंकाळी 6.19 वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी भेट दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, कोरपणा तहसीलदार कुमारी पल्लवी आखडे, गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम व पोलीस कर्मचारी तसेच एसएसटी पथक 5 चे नोडल अधिकारी प्रदीप भोंगळे व सहायक नोडल अधिकारी रवी मांजरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here