घुग्घुस येथील विठ्ठल मंदिरात महर्षी वाल्मीकी ऋषी जयंती उत्साहात साजरी
घुग्घुस येथील विठ्ठल मंदिरात रामायण महाकाव्याचे रचनाकार, आद्यकवी महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती येथील आई एकविरा मासेमारी भोई-ढिवर संस्थेतर्फे जयंती समाज बांधवसमावेत उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी महिर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे,कराटे प्रशिक्षक विनय बोढे,कविता कामतवार, कविता पचारे,आशा कामतवार मंचावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले.तसेच प्रमुख पाहुण्यांनी आप-आपले विचार व्यक्त करण्यात आले.संचालन शंकर नागपूरे यांनी केले.
यावेळी प्रयास संखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाले की, महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी आपल्या लेखणीतून प्रभू रामाला घराघरात पोहोचविले.रामायणतल्या शिकवणी आजही समाजासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.आदर्श जीवन कसे जगले पाहिजे हे शिकण्यासाठी प्रत्येकाने वाल्मिकी रामायण वाचावलांच हवे.
यावेळी जेष्ठ नागरिक बबन पारशिवे, वाल्मिक मांढरे, अशोक पारशिवे, मारोती बोरवार, कविता पचारे, कविता कामतवार, आशा कामतवार, मीनल कामतवार, गायत्री नान्हे, आई ऐकविरा मासेमारी भोई ढिवर संस्थेचे अध्यक्ष दीपक कामतवार, उपाध्यक्ष मारोती मांढरे, रोशन पचारे, सचिव अमोल नागपुरे, सहसचिव विशाल नागपुरे, दिलीप मांढरे, शंकर कामतवार, कोषाध्यक्ष विजय कामतवार, सदस्य गणेश कामतवार, रतन शिंदे, आशिष कामतवार, सुनील मांढरे, संदीप कामतवार, नागेश नागपुरे, भोला कामतवार, गजानन कामतवार, नंदकिशोर कामतवार, परमेश्वर कामतवार, आकाश कामतवार, राज नान्हे, गजानन पारशिवे, नुसाराम बावणे, सोहम पचारे, संतोष शिवरकर, सारंग कामतवार, अंकुश कामतवार, सतीश कामतवार व समाज बांधव मोठया संख्येत उपस्थित होते.