57 कोटी रुपयांतून पवित्र दीक्षाभूमी समतेचा संदेश देणारे जागतिक दर्जाचे केंद्र बनेल – आ. किशोर जोरगेवार

0
50

57 कोटी रुपयांतून पवित्र दीक्षाभूमी समतेचा संदेश देणारे जागतिक दर्जाचे केंद्र बनेल – आ. किशोर जोरगेवार

दीक्षाभूमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 

दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती, हे नव्या परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल होते. या दिक्षाभूमीवरून त्यांनी आपल्या अनुयायांना फक्त धर्माची दीक्षा दिली नाही, तर एका नव्या समतेची, बंधुत्वाची आणि न्यायाची शिकवण दिली. या पवित्र दिक्षाभूमीच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असून 57 कोटी रुपयांतून येथे जागतिक दर्जाचे काम होणार असून, ही दिक्षाभूमी समतेचा संदेश देणारे जागतिक दर्जाचे केंद्र बनणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दी क्षाभूमी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, नागपूरच्या धर्तीवर चंद्रपूर येथील दीक्षाभूमी विकास व्हावा यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू होते. यासाठी पहिल्या अधिवेशनात आपण एकत्रित 100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. याबाबत अनेक बैठका आपण मुंबई मंत्रालयात घडवून आणल्या; तांत्रिक अडचणींमुळे सदर काम थांबले होते. मात्र सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आपल्याला पहिल्या टप्यातील 56 कोटी 90 लक्ष रुपयांचा निधी आणता आला. नुकतेच आपण या कामाचे भूमिपूजन केले आहे. येथे एक सुंदर स्थळ तयार होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बाबूपेठ येथील धम्मभूमी महाविहार येथे आपण विपश्यना केंद्र तयार करत आहोत. या कामाचेही भूमिपूजन संपन्न झाले आहे. तसेच, मतदार संघातील 16 बुद्धविहारांमध्ये 16 अभ्यासिका तयार करण्यासाठी आपण 5 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. चंद्रपूर मतदार संघाचा चेहरा बदलत असून काही दिवसांतच या सर्व कामांना सुरुवात होणार असल्याचे ते बोलताना म्हणाले.
चंद्रपूरची दिक्षाभूमी ही लाखो अनुयायांच्या श्रद्धेचे पवित्र स्थान असून या दिक्षाभूमीचा सर्वसमावेशक विकास करण्याचा आपला संकल्प पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या लोकांना फक्त एका धार्मिक रूढीतून बाहेर काढायचं नव्हतं, तर त्यांना आत्मसन्मानाचं, स्वतंत्र विचारांचं आणि समताधारित जीवनाचं मार्गदर्शन करायचं होतं. जीवनात खरे परिवर्तन फक्त बाह्य गोष्टीतून होत नाही, तर आपल्या मनोवृत्तीमध्ये घडलेल्या परिवर्तनातून होतं. त्यांच्या या विचारांची समाजाला गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here