श्रीलंका नंतर मलेशिया देशाकडून ही प्रख्यात कवयित्रि कु.अर्चना सुतारला मिळाला पुरस्कार!
संयुक्त राष्ट्र संघाचा युनायटेड नेशन्स 75 th एनिवर्सरी हिस्टॉरिकल मेमोरियस अवार्ड 2020आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल!
किरण घाटे
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पाचवडच्या सुप्रसिध्द कवयित्रि कु.अर्चना दिलीप सुतार आज पावेताे
अनेक राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान पत्राच्या मानकरी ठरल्या आहे.
सुतार यांनी सामाजिक कार्यात अतिशय माेलाचे योगदान दिले असुन त्या एक शिक्षिका, कवयित्री तथा समाजसेविका म्हणुन विदर्भातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात परिचीत आहेत. जगभर पसरलेल्या महाभयानक कोरोनाच्या काळात (कोरोनाच्या सुरुवाती पासुन )समाजासाठी जीव तुटणाऱ्या (त्यांच्या) मनाची कोरोना बचावासाठी काय केले पाहिजे यासाठी त्यांनी अथक प्रयत्नांची पराकाष्ठा केलीे व आजच्या घडीला देखिल त्या करीत आहेत. प्रसारमाध्यमांद्वारे अनेक कवितांतून भारतभर जनजागृतीचे कार्य त्यांनी केले.इतकेच नाही तर समाजासाठी आपले आयुष्य स्वता वाहून घेतले. कवितांतून प्रबोधन करत महाराष्ट्रापुरत्या मर्यादित न ठेवता भारतभर आणि भारताच्या बाहेरही परदेशात त्यांनी आपले कार्य तनमनाने पुढे नेले .या उल्लेखनिय व अमुल्य कार्याचे श्रेय म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने भारतातील प्रत्येक राज्याने सन्मानपत्रे सन्मान चिन्हे तर कोणी पुरस्कार देऊन गौरवले असतानाच परदेशातूनही श्रीलंका देशाने सुध्दा दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार अर्चना सुतारला बहाल केले आहे.
आता तर नवलच! 24 ऑक्टोंबर 2020 रोजी जगातील अमेरिका,इंग्लंड, रशिया,चीन,नॉर्वे,म्याँनमार, ऑस्ट्रेलिया,पेरू,घाणा,इजिप्त, ब्राझील,कॅलिफोर्निया,व मुख्यालय असलेले न्यूयॉर्क आदि 193 देशांचा संयुक्त संस्थानचा 75 वर्धापन दिन साजरा झाला. या 75व्या (UN) संयुक्त संस्थाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन संयुक्त संस्थांनाच्या वतीने (मलेशिया)या देशाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन “युनायटेड नेशन्स 75th एनिवर्सरी हिस्टॉरिकल मेमोरियस अवार्ड 2020” हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना गौरविले .त्यांना हा पुरस्कार देत त्यांच्या कार्याचे कौतुक देखिल केले आहे. सदरहु पुरस्कार आंतरराष्ट्रीय विधि,आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानव अधिकार, विश्वशांती प्राप्त करणे, सुरक्षा, जागतिक महामारी( सध्याची कोविंड परिस्थिती )तसेच व्यसनमुक्ती अशा अनेक सामाजिक कार्याचा ठसा उमटवणांऱ्या व्यक्तींना दिला जातो. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात राष्ट्रांच्या वतीने दखल घेतली आहे. हा पुरस्कार मिळाल्याचे व्रूत कळताच महाराष्ट्र, भारत आणि परदेशातही सुप्रसिद्ध कवियित्री अर्चना दिलीप सुतार यांच्यावर सर्व स्तरांतील गणमान्य व्यक्ती साेबतच साहित्य वर्तुळातुन सातत्याने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तदवतचं प्रसिध्दीच्या झाेतात असलेल्या सहज सुचल व्यासपीठाच्या चंद्रपूर -गडचिराेलीच्या मुख्य संयाेजिका मेघा धाेटे ,सहसंयाेजिका मायाताई काेसरे ,प्रभा अगडे नागपूर , कविता चाफले , ज्याेति मेहरकुरे तथा सहज सुचलच्या सर्व महिला सदस्यांनी अर्चना सुतारचे गाेड काैतुक केले आहे. विशेष म्हणजे अर्चना सुतार ह्या सहज सुचलच्या सदस्या आहे.