अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे नोकारी शाळेतील शेड कामाचे भूमिपूजन

0
168

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे नोकारी शाळेतील शेड कामाचे भूमिपूजन

 

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगडचे सीएसआर आजूबाजूच्या गावांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

यासाठी उद्याचे आधारस्तंभ असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून जीवनात पुढे जावे, हे लक्षात घेऊन आज माणिकगड युनिट प्रमुख अतुल कंसल, वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश गहलोत व विभागप्रमुख नवीन कौशिक यांच्या नेतृत्वाखाली आज माणिकगढ ने जिल्हा परिषद शाळा नोकारी येथील टिन शेड बांधकाम कामाचे भूमिपूजन पारंपारिक पध्दतीने सरपंच मनीषा पेंदोर, उपसरपंच वामन तुराणकर व शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.

यावेळी नोकारी गावचे ग्रामसेवक, शाळा प्रशासन अध्यक्ष, शिक्षक, प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

या कामामुळे शालेय विद्यार्थ्यांना पावसात किंवा उन्हात या शेडचा लाभ घेता येईल व सुरक्षित वाटेल असे सांगून शिक्षकांनी माणिकगडचे आभार मानले. सरपंच मनीषा पेंदोर यांनीही या सीएसआर कार्याचे मनापासून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here