घुग्घुस शहरात “तुझेच धम्मचक्र हे फिर जगावरी” अभिवादन रॅली
जय भीमच्या जयघोषाने दुमदुमले शहर
विशेष प्रतिनिधी/पंकज रामटेके
घुग्घुस शहरातील नवनियुक्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरातील ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीम अनुयायांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अलोट बौद्ध बांधव व परिसरातील बरेच पक्ष समाज बांधवानी गर्दी केली होती.
यावेळेस घुग्घुस येथील वार्डा-वार्डातील सर्व विहार, आम्रपाली बौद्ध विहार, रमाबाई बौद्ध मंडळ, महाप्रज्ञा बौद्ध विहार, जैतवन महाबोधी बौध्द विहार, गौतम सिद्धार्थ बौद्ध विहार, यशोधरा महिला मंडळ, आप-आपले विहारात सामुहिक बौध्द वंदना एकत्रित होवुन ही रॅली पंचशील बौद्ध विहार समता वाचनालय घुग्घुस येथे एकत्रित येऊन भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस ने एकत्रित येऊन भगवान गौतम बुद्धचा मार्गाने शांतिपूर्ण जय भीम च्या नावाने नारे देत ही रॅली गांधी चौक, बँक ऑफ इंडिया ते तहसील कार्यालयात नवबौद्ध स्मारक समिती घुग्घुस डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा येथे समारोपीय कार्यक्रम आयोजित केले होते.
नवबौद्ध स्मारक समितीने रॅलीत येणारे बांधवाचे स्वागत करण्यात आले. तसेच तथागत गौतम बुद्ध, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच बौद्ध बांधव व अनेक सामाजिक पक्ष नेते मिळून ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सामुहिक बौध्द वंदना घेण्यात आली.
याप्रसंगी बौद्ध बांधव, परिसरातील समाज बांधव व सामाजिक पक्ष नेते आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शान्तिपूर्वक शोभा वाढवली.