विरुर येथे मोठ्या उत्साहात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा…

0
54

विरुर येथे मोठ्या उत्साहात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा…

 

विरूर स्टेशन / अविनाश रामटेके
अशोक विजयादशमी दिना निमित्त विरुरात आज पंचशील महिला मंडळ व नवयुवक बौध्द समाज मंडळ विरूर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने 68 वा धम्मचक्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम रमाई बुद्ध विहार येथे आंबेडकर अनुयायी यांच्या समक्ष पंचशील महिला मंडळ च्या अध्यक्ष सौ. सुप्रिया ताकसांडे यांनी तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर गावातून धम्म रॅली काढून बाजार चौकात असलेल्या प्रमुख ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवना च्या प्रांगणात तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश रामटेके यांच्या हस्ते तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध व प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा अर्चना करून बुद्ध वंदना घेऊन ध्वजारोहण करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करिता नवयुवक बौध्द समाज मंडळ चे अध्यक्ष श्री शाहू नारनवरे, सचिन पिपरे, नयन उराडे, बाळू वानखेडे, सुरज झाडे, महेंद्र उपरे, अतुल उपरे, विवेक मेश्राम, विक्की उपरे, मनीष देठे, प्रदीप देठे, रमेश चांदेकर, अशोक बक्षी, सुप्रिया ताकसांडे, आशा चांदेकर, गयाबाई दुर्गे, रमा ताकसांडे, रुपाली ताकसांडे निवृता झाडे आदिनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here