पारंपारिक आदिवासी दसरा मेळावा साजरा
संतोष मानूसमारे
कोरपना । आदिवासी समाजातील अविभाज्य भाग म्हणून आदिवासी समाजात महात्मा रावण यांना दैवत मानले जाते. प्रत्येक वेळी रावण दहन करण्यात येते. पण याला कुठे तरी थांबवण्यासाठी आज आदिवासी समाजातील विविध भागात या कुप्रथेला बंद करण्यात यावे. यासाठी या चेनई गावातील आदिवासी समाजातील सर्व गावकऱ्यांनी दसरा मेळावा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. परचाके, मेजर बंडूजी कुमरे, संतोष किनाके, संजुभाऊ सोयाम, शोमेस्वर कूमरे समस्त आदिवासी समाजातील सर्व गावकऱ्यांनी दसरा मेळावा साजरा केला.