लाॅयड्स मेटल्स उद्योग व लाॅईड्स इंफिनाईट फाउंडेशन तर्फे प्रथमच कम्यूनिटी कौशल्य प्रशिक्षण केंद्राचा पुढाकार
घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या मार्फत लाइट्स इन्फिनिट फाउंडेशन अंतर्गत विविध गावा-गावात उपक्रम राबविण्यात येत आहेत.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई अंतर्गत कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात आले आहे.
पांढरकवडा,शेणगाव,वढा,उसगांव, म्हातारदेवी,पिपरी व घुग्घुस येथील गोरगरीब गरजु विद्यार्थी शिक्षण घेत समोर भविष्यात जावु नाही शकत तसे विद्यार्थांना इलेक्ट्रिकल,वेल्डर व कारपेंटर या तीन विषयाच्या प्रशिक्षण ४५ दिवसात मार्गदर्शन देवुन,ट्रेनींग दिली व त्यांना कुशल बनविले.
तसेच दि.९ ऑक्टोबर २०२४ बुधवार रोजी त्यांना लाॅयड्स मेटल्स कंपनीचे प्रमुख हेड मा.श्री.वाय.जी.एस.प्रसाद कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून त्यांने विद्यार्थांना बोलण्यात आले की,तुम्ही आता कुशल झाले समोर भविष्यात तुम्ही आपले आई,वडीलाचे नाव रोशन करा चांगले जीवन जगा आणि पुर्ण सेफ्टी न काम करा असे अनेकानेक प्रकारचे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी कंपनीचे वरीष्ठ उपाध्यक्ष श्री.मुकेश भेलावे,प्रशिक्षण देणारे संचालक प्रथम श्री.राजेश ठोकळे, महाप्रबंधक प्रकल्प अरविंद कार, सीएसआर अधिकारी कु.नम्रपाली गोंडाणे, अनुराग मत्ते,श्री.प्रफुल शिंदे, निकीता गवळी,प्रदिप कोरडे व विद्यार्थी उपस्थित होते.