मयुरी वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू
दोन पिल्लांची प्रकृती गंभीर, ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील घटना
चिमिर । आशिष गजभिये
ताडोबा प्रकल्पातील बफर क्षेत्रात वनकर्मचाऱ्याना गस्त घालीत असताना तीन वाघाचे बछडे अस्वस्थ असवस्थेत आढळून आले त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले असता एका बछड्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असून दोन पिल्लावर उपचार सुरू आहेत.
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यलय खडसंगी (बफर) अंतर्गत येणाऱ्या नियतक्षेत्र खडसंगी -3 कक्ष क्र.५३ मध्ये क्षेत्रीय कर्मचारी गस्तीवर होते. दरम्यान तीन वाघिणीचे बछडे कर्मचाऱ्यांना अशक्त स्थितीत आढळून आले होते. कर्मचार्यांनी पिल्लांचा मागोवा घेतला असता त्यांचातील एक बछडा अत्यंत गंभीर स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांला उपचाराकरिता चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्र येथे नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांनी दिलेल्या sop नुसार आज त्या मृत बछड्याचा शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. आज वनकर्मचारी (बफर) चे गस्तीवर जाऊन म्युरीच्या अजून दोन बछड्याचा मागोवा घेतला असता ते पण अशक्त स्थितीत आढळून आले आहे. त्या बछड्याना सुद्धा वनकर्मचाऱ्यानी पकडून आज उपचाराकरिता चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्र येथे नेण्यात आले असून, सध्या त्या मयुरीच्या दोन बछड्यावर उपचार सुरु आहे. खडसंगी वनपरिक्षेत्राअंतर्गत चे क्षेत्रीय कर्मचारी व विशेष व्याघ्र संरक्षण दल यांचे मार्फत त्या तीन बछड्याच्या आईचा मयुरी (वाघीण) शोध घेणे सुरु आहे. सदर कारवाही उपसंचालक (बफर) व सहाय्यक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली खडसंगीचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे हे करीत आहेत.