नारीशक्ती सन्मान कार्यक्रम श्रीकृष्ण सभागृह, कोरपना येथे संपन्न

0
182

नारीशक्ती सन्मान कार्यक्रम श्रीकृष्ण सभागृह, कोरपना येथे संपन्न

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील योगदानाबद्दल अंगणवाडी सेविकांचा समिती अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा हस्ते सन्मान

 

कोरपना :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मोलाचे योगदान दिले; अशा राजुरा विधानसभेतील अंगणवाडी सेविकांच्या सन्मानार्थ समीतीचे विधानसभा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून ‘नारीशक्ती सन्मान कार्यक्रमाचे’ आज कोरपना येथील श्रीकृष्ण सभागृहात आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची मोठ्या संख्येने उपस्थित राहत ‘देवरावभाऊ’ कडून सन्मान स्विकारला.

राज्यात झपाट्याने लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही अल्पावधीतच सर्वदूर पसरली. राज्यभरातील पात्र महिला भगिनींनी सदर योजनेला प्रचंड प्रतिसाद देऊन लाभ घेत आहेत. परंतू ही योजना तळागाळातील महिला भगिनींपर्यंत पोहचविण्यासाठी तुम्हा अंगणवाडी सेविका भगीनींनी मोठी मेहनत घेतली. त्याबदल तुमचा कृतज्ञतापूर्वक सन्मान व्हावा, तुमच्याशी भेट व्हावी या उद्देशाने खरंतर आजचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती देत येत्या काळात एक भाऊ म्हणून अंगणवाडी सेविका भगीनींच्या सहकार्यासाठी मी कायम सोबत राहीन, असा शब्दही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना समीतीचे विधानसभा अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित अंगणवाडी सेविकांना दिला.

यावेळी मंचावर माजी पं. स. माजी सभापती संजय मुसळे, संवर्ग विकास अधिकारी विजय पेंदाम, तालुका संजय गांधी निराधार योजना समीतीचे अध्यक्ष नारायण हिवरकर, मु.मा.ला.ब.यो. समीतीचे सदस्य आशिष ताजणे, माजी सरपंच अरूण मडावी, पुरुषोत्तम भोंगळे, माजी सरपंच प्रमोद कोडापे, नगरसेवक किशोर बावणे, माजी सरपंच विजय रणदिवे, मनोज तुमराम, उमेश पालिवाल यांचेसह पं. स. चे विस्तार अधिकारी मयुर बरसिंगे, निवृत्त झाडे, मीनाक्षी खिरटकर, आशा वाघमारे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here