अमोल लोडे या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शेकडो युवकांनी पुढाकार घेऊन मूक मोर्चा काढत नोंदविला निषेध…
कोरपना, तालुका प्रतिनिधी :- तालुक्यात अमोल लोडे या शिक्षक पेशातील नराधमाने अत्याचार प्रकरणी काल दिनांक ऑक्टोंबरला भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मूक मोर्चात सामाजिक कार्यकर्ते व सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात अमोल लोडे याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शेकडो युवकांनी हातात काळी फित बांधून मूक मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. संविधान चौक ते पोलीस स्टेशन गडचांदूर पर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला.
डॉ. बाबासाहेब व छञपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरवात करण्यात आली. सदर नराधमास लवकरात लवकर कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन पोलीस स्टेशन गडचांदूर चे ठाणेदार कदम यांना देण्यात आले.
या मुकमोर्चात सर्व सामाजिक कार्यकर्ते व सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शिक्षक पेशाला काळीमा फासणारी आहे. अशा घटना किंवा कोणत्याही मुलीवर अन्याय झाल्यास त्यांनी पोलीस स्टेशनला अगोदर कळवावे अशी माहिती ठाणेदार यांनी दिली. अशी घटना वारंवार होऊ नये यासाठी पालकांनी व मुलींनी आधी पोलिस अधिकारी यांना कळवावे, जेणेकरून अश्या घटनावर पोलीस प्रशासन योग्य वेळी आळा घालू शकेल. या नरधमास कठोर शिक्षा व्हावी यासाठी गडचांदूर मधील शेकडो युवकांनी या मूक मोर्चामध्ये सहभाग घेतला.
यामध्ये सहभाग सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर, जबू शेख, प्रवीण सातपाडी, दीपेश वनकर, सामाजिक कार्यकर्ते विकी उरकुडे, अक्षय भादंकर, राजु गडगीलवार, उपजिल्हाध्यक्ष युवा सेना प्रणिता अहिरकर तसेच काँग्रेस जिल्हा औद्योगिक सेल रोहित शिंगाडे, भाजपा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहन काकडे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष सचिन भोयर, नगरपरिषद उपाध्यक्ष शरद जोगी, युवा उद्योजक माधव हेपट, जिल्हाध्यक्ष प्रहार सतीश विटकर, जिल्हाध्यक्ष दिव्यांग पंकज माणूसमारे, काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरद पवार गट मयूर एकरे, खिरर्डीचे उपसरपंच दीपक खेकारे, आप पक्षाचे मिलिंद ताकसाडे, मनसेचे मनपा नगरसेवक सचिन भोयर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य रूऊफ खान वजीर खान, अतुल गोरे, युवक काँग्रेस तालुका प्रवक्ते युवा नेते अशोक बोधे, पत्रकार प्रवीण मेश्राम, वैभव गोरे, युवा नेते वैभव आणि सर्व राजकीय पक्षांच्या युवकांचा सहभाग मोठ्या संख्येने होता.