सिद्धबली कंपनीचे अधिकारी कार्यवाहीत अडचण निर्माण करीत असतांना आमदार जोरगेवार यांनी त्यांची पूजा करायची का ?
सिद्धबली कंपनीत अपघात झाल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन कामगार जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी सिद्धबली कंपनीत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी कामगारांप्रतीचे कंपनीचे जिवघेणे धोरण आमदार जोरगेवार यांच्या लक्षात आले कामगारांना कोणतेही सुरक्षेचे साधने न देता त्यांच्याकडून जोखमीचे काम करून घेतले जात असल्याने या झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असल्याचे यावेळी निदर्शनास आले. झालेल्या अपघाताची कारणे, कामगारांची सुरक्षा आणि मृत्युमुखी पडलेल्या कामगार अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा सुरू असतांना कंपणीचा अधिकारी मध्ये – मध्ये बोलून व्यत्यय निर्माण करीत होता. कामगारांच्या मृत्यूमुळे आधीच अस्वस्थ झालेले आमदार जोरगेवार यांना वारंवार येणाऱ्या व्यत्ययामुळे राग अनावर झाल्याने अनुदगार बाहेर पडले. कंपनीचे अधिकारी कार्यवाहीत अडचण निर्माण करीत असतांना आमदार जोरगेवार यांनी त्यांची पूजा करायची का ? कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सेप्टी मॅनेजर कडे तो सेप्टी मॅनेजर असल्याचे कोणतेही कागदपत्रे नव्हते त्याला सेप्टी कामाचा अनुभव सुद्धा नव्हता. त्यामुळे आमदार जोरगेवार यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार दोषी अधिकाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.