घुग्घुस येथील मुन्नुरूकापू समाज महिलांतर्फे “बतकम्मा” उत्सव साजरा
शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी घुग्घुस मुन्नुरूकापू समाज कार्यालयात “बतकम्मा महाऊत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. घुग्घुस शहरातील शेकडो तेलुगू भाषिक कुटुंबांनी महिलांनी प्रोत्साहन देण्यासाठी आपला सहभाग दर्शविला. मुन्नुरूकापू महिला किटी पार्टी संघातर्फे तिसरा दिवस आनंदात साजरा करण्यात आला.
मुन्नुरूकापू समाजाचे जिल्हा सचिव शंकर सिद्दम यांनी यावेळी बोलताना सांगितले की, २०२५ व्या वर्षी सर्व समाज बांधव महिलांनी एकत्र येऊन एकाच मंचावर हसत खेळत “बतकम्मा” उत्सवात सहभाग घ्यावा. यावेळी बेस्ट ट्रेडिशन लेडी, सर्वोत्कृष्ट पारंपरिक गायन करण्यात आले. शहरातील अनेक तेलुगु व सर्वधर्म समभाव समाज परिवारांनी उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी रमादेवी, भाग्य, समाजातील श्रीलता, सुजाता, पद्मा सरिता, दासरी सरिता, सपना, कल्याणी, रजनी, लावण्य, दीपा, स्वर्णलता, पद्मा, कमला आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.