ब्रिजभूषण पाझारे यांची मुंबईत चंद्रपूर विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी : श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक

0
86

ब्रिजभूषण पाझारे यांची मुंबईत चंद्रपूर विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी : श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक

आज खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन चंद्रपूर विधानसभेबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. यावेळी ब्रिजभूषण पाझारे यांनी चंद्रपूर विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली. चंद्रपूर विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या विधानसभेत ब्रिजभूषण पाझारे यांनी अनेक वर्षांपासून विविध पदांवर काम केले आहे. समाजकल्याण सभापती, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी या क्षेत्रात कार्यरत राहून जनतेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या सर्व कार्यकाळात चार वेळा निवडणुका लढवून विजय प्राप्त करून त्यांनी समाजाच्या सेवेसाठी कायमच तत्पर राहण्याचा ध्यास घेतला आहे.

ब्रिजभूषण पाझारे यांचा अनुभव आणि कार्यकाळातील यशाचा विचार करून भारतीय जनता पार्टीकडून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. आपल्यासारख्या अनुभवी नेतृत्वाने यावर विशेष लक्ष द्यावे. तसेच यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या उमेदवारीसाठी प्रस्ताव पाठवण्याची विनंती यावेळी पाझारे यांनी केली.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. विकासकामे थांबली आहेत, काही कामांवर योग्य निर्णय घेतला गेलेला नाही आणि जनतेच्या अनेक समस्यांची सोडवणूक झालेली नाही. ब्रिजभूषण पाझारे यांची उमेदवारी निश्चित झाल्यास, त्यांनी या प्रलंबित विकासकामांना चालना देण्यासाठी आणि चंद्रपूरच्या जनतेच्या सेवा-सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचे वचन यावेळी दिले आहे.

माझ्या कामातील निष्ठा आणि सेवाभाव यामुळे मी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलो आहे. माझ्या नेतृत्वात चंद्रपूर विधानसभेत एक सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या वेळामुळे आणि घेतलेल्या सविस्तर चर्चेमुळे मला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे. मी माझा संपूर्ण बायोडाटा त्यांच्या पुढे सादर करून माझ्या कार्यकाळातील अनुभव आणि यशाचे विवरण दिले आहे.

मी पुन्हा एकदा आपणास विनंती करतो की, आपण माझ्या उमेदवारीचा विचार करून पक्षाच्या अधिकाऱ्यांपर्यंत माझी मागणी पोहोचवावी. जेणेकरून चंद्रपूर विधानसभेतील विकासप्रक्रियेचे नवे पर्व सुरू करता येईल. जनतेच्या विश्वासाला आणि त्यांच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी मला एक संधी द्यावी, हीच माझी अपेक्षा आहे, असे पाझारे यांनी शिंदे यांच्याशी चर्चा करताना बोलून दाखवले. सदर बैठकीला भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, सुरज पेंदुलवार, प्रज्वल कडु तसेच राकेश बोमावर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here