अवंती अंबर सामाजिक प्रतिष्ठान संस्थेतर्फे विद्यार्थिनींना नोटबुक वितरण
घुग्घुस येथील प्रियदर्शिनी कन्याविद्यालय शाळेत गांधी जयंतीनिमित्त दि.४ ऑक्टोबर २०२४ शुक्रवार रोजी विद्यार्थिनीला अवंती अंबर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मा.श्री.महेश मेंढे यांच्या मार्फत नोटबुक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.महेश मेंढे म्हणटले की शिक्षण हा आपल्या जीवनातील महत्वाचा घटक असुन, प्रत्येक व्यक्ती हा साक्षर झाला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी हा शिकला पाहिजे.
काही दिवसांपूर्वी गरजू विधवा महिल्यांना शिवणयंत्र वाटप करण्यात आले.त्यांनी आपल्या स्वताच्या पायावर हिंमतीने मेहनत करुन समोर जावुन चांगले जीवन जगले पाहिजे स्वाताच्या पायावर उभे होवुन परिवार चालवला पाहीजे समोर भविष्यात मला जेवडे मदत करण्यात येणार तेवढे मी मनापासून मदत करत राहणार.
नोटबुक वितरण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जेष्ठ काँग्रेस नेते शेखर तंगल्लापेल्ली व कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शाळेचे प्राचार्य व शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थींनी महेश मेंढे यांच्या मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.