चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव

0
70

चंद्रपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आदिवासी वीरांगणा राणी दुर्गावतीचे नाव

ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

आदिवासी समाजाने मानले ना. मुनगंटीवार यांचे आभार

चंद्रपूर,दि. ४ – राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) राणी दुर्गावती यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. राणी दुर्गावतीच्या ५०० व्या जन्मशताब्दी वर्षात हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. ना. श्री. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वी कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्रालयाला यासंदर्भातील प्रस्ताव पाठवला होता, हे विशेष.

आदिवासींच्या समृद्ध इतिहासात आपल्या अफाट शौर्यासाठी ओळखली जाणारी राणी दुर्गावती हिचे नाव महिलांसाठी समर्पित एका संस्थेला देणे, ही अत्यंत आनंदाची बाब मानली जात आहे. त्यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांचे आदिवासी समाजाकडून आभार मानण्यात येत आहेत. ना. श्री. मुनगंटीवार यांनी १८ सप्टेंबर २०२४ ला संबंधित विभागाला पत्र दिले होते. चंद्रपूर येथील महिलांसाठी असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राणी दुर्गावती यांचे नाव देण्याचा प्रस्ताव त्यांनी पाठवला होता. त्यानुसार सोमवार, दि. ३० सप्टेंबरला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करून निर्णय जाहीर करण्यात आला. तसे कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्रालयाकडून ना. श्री. मुनगंटीवार यांना कळविण्यात आले आहे.

विरांगणा राणी दुर्गावतीने आपल्या राजवटीत उत्तम प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून लौकीक प्राप्त केला. सशक्तपणे आदिवासी साम्राज्य सांभाळत शत्रूंपासून सुरक्षित ठेवले. त्यामुळे महिलांसाठी समर्पित संस्थेला तिचे नाव देणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, अशी भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

राणी दुर्गावती यांची ५०० वी जन्मशताब्दी

विरांगणा राणी दुर्गावती यांचा ५०० वी जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (महिला) राणी दुर्गावती हिचे नाव देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांच्यामुळे हे शक्य होऊ शकले, याबद्दल आदिवासी बांधवांनी त्यांचे विशेषत्वाने आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here