स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विविध उपक्रम राबवून राष्ट्रपित्याला आदरांजली
घुग्घुस :- इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात विविध उपक्रमाद्वारे ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ हे अभियान राबवून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या १५५ व्या जयंती निमित्य आदरांजली देण्यात आली.
या पंधरवाडयात महाविद्यालया अंतर्गत ठिकठिकाणी परिसर स्वच्छतेचा, स्वच्छते संबंधीत जाणीव- जागृती होण्यासाठी विविध घोषणेचे फलक बनवून घुग्घुस परिसरात तसेच दत्तक गाव वढा येथे रैली काढून उद्बोधनात्मक पथनाट्य सादर केले. तसेच ठिकठिकाणी कुटुंबस्तरावर नागरिकांच्या भेटी घेऊन शोषखड्डे / पाझरखड्डे आणि कचऱ्याचे व्यवस्थापन या संबंधीची माहिती दिली. त्याचप्रमाणे स्वच्छ प्रभाग स्पर्धा वेस्ट टू आर्ट या स्पर्धेअंतर्गत बी. ए व बी. कॉम च्या विद्यार्थिनिंनी मोठ्या प्रमाणात उत्कुर्त सहभाग घेऊन स्वच्छते बाबत नवीन कल्पना मांडल्या. या विविध स्पर्धेतील विजेत्या टिमला पारितोषिक वितरणाचा तसेच सफाई कामगारांना भेटवस्तु देऊन त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम दिनांक २ आक्टोंबरला बुधवारी गांधी जयंती साजरी करून ‘स्वच्छता ही सेवा ‘ या अभियानाची सांगता करण्यात आली.
या संपूर्ण पंधरवाडयात इंदिरा गांधी महिला महाविद्याल्याच्या संचालिका प्रा. शहनाज पठान मॅडम यांची प्रेरणा लाभली तसेच सर्व प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे अभियान यशस्वी करण्यात आले.