अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अकोला येथून केली अटक
संपूर्ण देशामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात वाढ झाल्याने अत्याचार करणाऱ्या च्या विरोधात संतापाची लाट पसरलेली आहे.असे असताना कोरपणा येथील एका इंग्रजी या खाजगी शाळेतील शिक्षक अमोल लोंढे यांनी अल्पवयीन मुलीला नशेच्या गोळ्या देत सहाव्या वर्गातील विद्यार्थिनी वर वारंवार अत्याचार केले हा शिक्षक कोरपणा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष असल्याचे समजते. पिडीत अल्पवयीन मुलींने कोरपणा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवला याची माहिती लागताच आरोपी अमोल लोंढे हा मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांनी आरोपीला तात्काळ अटक व्हावी याबाबत गुन्हे शाखेला निर्देश दिले.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तात्काळ चक्र फिरवून आरोपी हा अकोला बस स्थानकावर असल्याची माहिती मिळविली व त्याला अटक करण्यात आली या घटनेमुळे कोरपना शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे.घटनेच्या निषेधार्थ शाळकरी मुलांचा निषेध मोर्चा काढण्यात आला असून युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी अमोल लोंढे यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी केली आहे पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांनी या प्रकरणात अजून कोणी पिढीत असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी असे आव्हान केले.