ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन…
घुग्घुस येथील ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विचार व्यक्त करताना माजी सरपंच संतोष नुने म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारावरच भारतातील प्रत्येक व्यक्तिने चालले पाहिजे किंबहुना त्यांच्याच विचारांमध्ये प्रगतशील भारताचा आत्मा लपलेला आहे. प्रत्येकाने त्यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन सत्याच्या मार्गाने जीवन कंठीत केले पाहिजे.
तसेच शास्त्री हे शांतता आणि लोकशाहीचे खरे चॅम्पियन होते. अशा प्रकारे, त्यांनी भारताला जगात शांततेचा आश्रयदाता म्हणून कल्पना दिली. तथापि, आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या किंमतीवर ते कधीही काहीही स्वीकारण्यास तयार नव्हते आणि देशाच्या हिताचे रक्षण करणे हे आपले प्रथम आणि प्रमुख कर्तव्य आहे असे ते नेहमी मानत असत.
यावेळी माजी सरपंच संतोष नुने, जिल्हा सचिव विनोद चौधरी, इर्शाद कुरेशी, पियुष भोंगळे, संदिप तेलंग, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार,भारती परते,स्वाती गंगाधरे,नेहा कुम्मरवार, पायल वाडगुरे आदींची उपस्थिती होती.