महात्मा राजा रावण यांचे पुतळ्याचे दहन प्रथा बंद करा!
नवएकता जय सेवा बहुउद्देशीय संस्था चांदागड संस्था घुग्घुस यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन!
समस्त बहुजन महिला घुग्गुस व गोंड आदिवासी महिला व नवएकता जय सेवा बहुउदेशीय संस्था चांदागड घुगुस च्या वतीने घुग्गुस येथे रावण दहणाची परवानगी न देण्याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन घुग्गुस, तहसीलदार, मुख्यधिकारी घुग्गुस सर्व प्रशासकीय अधिकारीना विजयादशमी दिनानिमित्त घुग्गुस येथे रावण पुतळा दहणाची परवानगी न देण्याबाबत निवेदन दिले.
घुग्गुस येथे दरवर्षी गोंड आदिवासी समाज बांधव, दैवत महात्मा रावण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन न करण्याबाबत शासन प्रशासनाला निवेदन देतात. व शासन प्रशासन दुर्लक्ष करतात. त्यामुळे समाजाचा धार्मिक भावना दुखविल्या जाते. गोंडीयन आदिवासी समाज बांधव घुग्गुस येथे महात्मा रावणाची भक्तिभावाने पूजा करतात, रॅली काढतात, रावण गोंगो पूजा करतात, घुग्गुस गावात, गेल्या वर्षी 24/10/2023 विजयादशमीच्या दिवशी घुग्गुस येतील आदिवासी महिलांनी ज्या पटांगणावर रावण दहन होते त्या ठिकाणी जाऊन रावण दहन बंद करा असा निषेध दर्शवीला. त्याकरिता सर्व महिलांना, पुरुषांना, लहान मुलांना, म्हाताऱ्यांना, जवळपास २०० आदिवासींना सकाळी ९ ते रात्री १०:१५ वाजेपर्यंत पोलीस स्टेशन घुगुसच्या आवारात दसऱ्याचा दिवशी बंदिस्त करून ठेवण्यात आले होते. जर ज्या ठिकाणी आदिवासी समाज बांधव रावणाची पूजा करत असेल व जाळतात म्हणून निषेध दर्शवित असेल, समाजाच्या धार्मिक भावना दुखवत असेल तर आपसात, द्वेष, निर्माण होत असेल तर, त्या गावी त्या ठिकाणी शासन प्रशासनाने पुतळा दहणाची परवानगीच दिली नाही तर सदर गावात आपसात द्वेष निर्माण होणार नाही. याची प्रशासनाने दखल घेऊन योग्य पाऊले उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन देतांना प्रीती तामगाडगे, गीता कुमरे, उज्वला उईके, पूनम कांबळे, सुरेखा तोडासे निकिता वाघमारे, भारती सोदारी, करुणा भगत, सुषमा उईके, रेखा आत्राम, रजनी टेकाम, पुष्पा टेकाम, विद्या आत्राम, अनिता सोयाम, विद्या आत्राम, दुर्गा विजय आत्राम, सुनीता गेडाम, शोभा येटे, पूजा उईके, मंजुळाबाई गुंदे, मनीषा टेकाम, सुरेखा कोडापे आदी उपस्थित होते.