घुग्घुस येथील प्रियदर्शनी कन्या शाळेतर्फे मुलीचे शिक्षण-राष्ट्रीय अभिमान
प्रियदर्शिनी कन्या कनिष्ठ महाविद्यालय घुग्घुस यथे दि.२७ सप्टेंबर २०२४ ला स्वछता ही सेवा कार्यानंतर्गत भारत स्काउट गाईड तथा रोअर रेंजर युनिट तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सर्वप्रथम स्वच्छते बाबत प्रा. वनकर सरांनी विद्यार्थिनींना शपथ दिली. त्यानंतर विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका मिळून मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचे महत्व विषद करण्यात आले. महाविद्यालय परिसरात स्वच्छता घेण्यात आली, मॅरेथान स्पर्धा घेण्यात आली. स्वच्छतेसंबधी विद्यार्थिनीं कडून प्रभातफेरी काढण्यात आली. नंतर घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. तसेच पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात स्वच्छतेचे विशेष आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींकडून स्वच्छता सेवा देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य अनु खानझोडे यांचे मार्गदर्शनातून करण्यात आले. यावेळी भारत स्काउट गाईड कॅप्टन प्रा. डॉ. वैशाली जोशी यांनी विद्यार्थिनींना महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. सातार्डे, प्रा. वनकर, प्रा. झाडे मॅडम, प्रा. पाझारे मॅडम, प्रा. गुर्जलवार सर तथा स्काउट च्या विद्यार्थिनी त्यामध्ये कु. मनस्वी वनकर, कु. श्रुती बुद्यार्थी, कु. प्रेरणा कांबळे, कु. तनु धोटे, रिजानूर सिद्धिकी, कु.पूजा उपलेटी, कु.पायल बोतकर व इतर सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.